

कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, आकाशाक धुराचे मोठे काळे ढग दिसत होते.
वृत्तानुसार, एलटीटीच्या व्यस्त प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील जन आहार कँटिनमध्ये दुपारी 3 च्या सुमारास आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी 3.30च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.