मालाड इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये अग्निभडका

या दुर्घटनेत पाच ते सहा गाळ्यांतील सामान जळून खाक झाले
मालाड इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये अग्निभडका

मालाड पश्चिम रामचंद्र लेन येथे तळ अधिक एक मजली मालाड इंडस्ट्रियल इस्टेट आहे. या इस्टेटच्या पहिल्या मजल्यावरील एका गाळ्यात गुरुवारी रात्री ९.३८ च्या सुमारास आग लागली. काही वेळातच आग वाऱ्यासारखी पसरली आणि पाच ते सहा गाळ्यांना त्याची झळ बसली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून गाळ्यातील सामान जळून खाक झाले. मालाड पश्चिम रामचंद्र लेन येथे तळ अधिक एक मजली मालाड इंडस्ट्रियल इस्टेट आहे. या इस्टेटच्या पहिल्या मजल्यावरील एका गाळ्यात गुरुवारी रात्री ९.३८ च्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत पाच ते सहा गाळ्यांतील सामान जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून पुढील तपास स्थानिक पोलीस, पालिका अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in