मोठी बातमी : घाटकोपरमधील पारेख रुग्णालयाच्या इमारतीला आग; एकाचा मृत्यू

मोठी बातमी : घाटकोपरमधील पारेख रुग्णालयाच्या इमारतीला आग; एकाचा मृत्यू

घाटकोपर पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला आग लागल्याने एकच खळबळ उडाली
Published on

घाटकोपर पूर्वमधील स्टेशन पासून जवळ असलेल्या पारेख रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णालयाच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. ही बातमी कळताच आग विझवण्यासाठी ३ अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाले. बऱ्याच काळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यादरम्यान, एकाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, रुग्णालयातील २२ जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता अग्निरोधक यंत्रणा उपस्थित होती की नाही? फायर ऑडिट झाली होती की नाही? हा प्रश्न उपस्थित होतो.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या खाली असणाऱ्या हॉटेलच्या मागच्या बाजूला ही आग लागली. त्यानंतर ही आग वरती असलेल्या रुग्णालयापर्यंत आग पोहोचली. साधारण १ ते १.३०च्या दरम्यान ही आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम सुरु केले. साधारण १० ते १५ मिनिटांपासून लागलेल्या या आगीने गंभीर स्वरुप धारण केले. त्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीत आगीचे लोट पसरु लागले. मात्र, रुग्णांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in