Fire in Mumbai Fashion Street : मुंबईच्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट परिसरात भीषण आग!

एकाला लागून एक अशी दुकाने असल्याने अनेक दुकाने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.
Fire in Mumbai Fashion Street : मुंबईच्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट परिसरात भीषण आग!
@ASKarpe
Published on

मुंबईतील सुप्रसिद्ध अशा फॅशन स्ट्रीट परिसरातील काही दुकांनांना भीषण आग लागली. (Fire in Mumbai Fashion Street) प्राथमिक माहितीनुसार, शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. एकाला लागून एक अशी दुकाने असल्याने अनेक दुकाने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबईमधील फॅशन स्ट्रीट परिसरात आग लागल्याने चांगलाच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे शनिवारी-रविवारी याठिकाणी खरेदीसाठी चांगलीच गर्दी असते. परंतु, दुपारची वेळ असल्याने याठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामध्ये २०हुन अधिक दुकाने जाळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी सध्या या रस्त्यावरची वाहतूक थांबवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in