मुलुंडमध्ये सहा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग ; मदतकार्य वेगाने सुरू

मुलुंडमधील धीरज अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही
मुलुंडमध्ये सहा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग ; मदतकार्य वेगाने सुरू

मुंबईतील मुलुंडमधील एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजता भीषण आग लागली. मुलुंड स्टेशन परिसरात असलेल्या सहा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

मुलुंडमधील धीरज अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळे धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. काही वेळाने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी अजून संपूर्ण घटना समजली नाही. 

logo
marathi.freepressjournal.in