Mumbai : वेसावा खाडीतील कांदळवनांची बेसुमार तोड; मच्छीमार सागरी हक्क समितीचा तीव्र आक्षेप

कोस्टल रोड व वर्सोवा–मढ पुलाच्या बांधकामासाठी वेसावा खाडीतील उपखाडी असलेल्या कवठेखाडीच्या कांदळवनांनी व्यापलेल्या किनारपट्टीवर दिवस-रात्र तोड सुरू आहे.
Mumbai : वेसावा खाडीतील कांदळवनांची बेसुमार तोड; मच्छीमार सागरी हक्क समितीचा तीव्र आक्षेप
Mumbai : वेसावा खाडीतील कांदळवनांची बेसुमार तोड; मच्छीमार सागरी हक्क समितीचा तीव्र आक्षेप प्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : कोस्टल रोड व वर्सोवा–मढ पुलाच्या बांधकामासाठी वेसावा खाडीतील उपखाडी असलेल्या कवठेखाडीच्या कांदळवनांनी व्यापलेल्या किनारपट्टीवर दिवस-रात्र तोड सुरू आहे. या परिसरातील मोठ्या प्रमाणावरील कांदळवनांची झाडे कापली जात असल्याने पर्यावरण, जैवविविधता आणि पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत वेसावा येथील मच्छीमार सागरी हक्क समितीने तीव्र आक्षेप नोंदवत संताप व्यक्त केला आहे.

सुमारे १,२५० झाडे कापली जाणार असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक झाडे तोडली जात असल्याचा आरोप समितीने केला आहे.

माशांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होतोय

कवठेखाडीतील कांदळवन हा केवळ हिरवागार परिसर नसून सागरी पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आणि पारंपरिक मच्छीमारांच्या जीवनाशी निगडित नैसर्गिक अधिवास आहे. मात्र, असे असतानाही येथे कांदळवनांची तोड सुरू असून तोड करण्यात आलेली झाडे तिथेच उघड्यावर टाकून देण्यात आली आहेत. याची सरकारने योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in