वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेली बोट उलटली, दोन जण बेपत्ता तर एकाने पोहून किनारा गाठला

शनिवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास या दोघांसह अन्य एका व्यक्तीने वर्सोवा भागातील देवाजीवाडी येथून मासेमारी करण्यासाठी ही बोट समुद्रात सोडली होती
File photo
File photo

मुंबईतील वर्सोवा किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात बोट उलटल्याने दोन मच्छिमारांचा मृत्यू झाल्याची भीती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी रविवार रोजी व्यक्त केली आहे. शनिवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास या दोघांसह अन्य एका व्यक्तीने वर्सोवा भागातील देवाजीवाडी येथून मासेमारी करण्यासाठी ही बोट समुद्रात सोडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे तिघेजण काल संध्याकाळच्या सुमारास बोट घेऊन मासेमारी करण्यास गेले होते. परुंत पाण्याचा वेग जास्त असल्याने बोट उलटून तिघे बुडाले. दरम्यान. यांच्यातील एक व्यक्ती कसाबसा जीव वाचवात किनाऱ्यापर्यंत पोहचला.

स्थानिक नागरिकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांना पोलिसांना याबाबत कळवलं. यानंतर तात्काळ पोलीस आणि बचावकार्य करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन बोट समुद्रकिनाऱ्यापासून २-३ किमी अंतरावर उलटली. विजय बामानिया या ३५ वर्षीय वक्तीने पोहून कसाबसा समुद्रकिनारा गाठला. तर उस्मानी भंडारी (वय २२) आणि विनोद गोयल (४५) हे दोघे बेपत्ता आहेत. अग्निशमन दल, जीवरक्षक दल आणि पोलीस यांच्याकडून या दोघांचा शोध घेतला जात आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास तीन जणांनी मासेमारीसाठी समुद्रात ही बोट सोडली. यावेळी बोट पाण्यात बुडाली. यातील एकजण वाचला असून दोन जण बुडाले आहेत. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. यामुळे या परिसरता भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी या दोघांना बेपत्ता घोषीत केलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in