बोरिवली येथे दरोड्यासाठी आलेल्या पाच आरोपींना अटक

घातक शस्त्रांसह दरोड्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत
बोरिवली येथे दरोड्यासाठी आलेल्या पाच आरोपींना अटक

मुंबई : बोरिवली येथे दरोड्यासाठी आलेल्या पाच आरोपींना एमएचबी पोलिसांनी अटक केली. हर्षित द्वारकाप्रसाद हरिजन ऊर्फ कटर, विवेक विशाल पाटोळे, रोहित सुभाष धोत्रे, गोलू द्वारकाप्रसाद हरिजन, राजेंद्र प्रकाश जाधव अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या पाचही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बोरिवलीतील आयसी कॉलनी परिसरात एका इमारतीचे कन्स्ट्रक्शन साईट आहे. तिथे असलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण करुन लुटमारीच्या उद्देशाने काही सराईत गुन्हेगार येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी रात्री उशिरा दिडच्या सुमारास तिथे एका रिक्षातून सहाजण आले होते. या सहाजणांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला; मात्र पोलिसांना पाहताच ते सर्वजण पळू लागले. यावेळी पळून जाणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्यांचा सहावा सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या आरोपींकडून एक कोयता, एक चाकू, मिरची पावडर, सेलो टेम, नायलॉन दोरी, पक्कड आणि स्क्रु ड्राव्हर आदी घातक शस्त्रांसह दरोड्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in