ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील पाच ठगांना अटक

टास्क पूर्ण करताना तिने ३२ हजार रुपये ट्रान्स्फर केले
ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील पाच ठगांना अटक

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील पाच सायबर ठगांना साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप राजभर, शिवम सिंग, पृथ्वीराज चौहाण, संदीप यादव आणि विशांत चौरसिया अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या पाचही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरी परिसरात तक्रारदार तरुणी राहत असून, ऑगस्ट महिन्यांत ती तिच्या कार्यालयात असताना तिला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठविला होता. त्यात तिला पार्टटाईम जॉबची ऑफर देऊन विविध टास्कद्वारे जादा परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या टास्कमध्ये तिला गुगल ब्रॅचमध्ये रिव्ह्यू देण्याचे काम देण्यात आले. तिने काही टास्क पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात कमिशनची रक्कम जमा झाली होती. त्यामुळे तिने अज्ञात व्यक्तीने दिलेले सर्व टास्क पूर्ण केले होते. त्यानंतर तिला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करुन प्रिपेड टास्क देण्यात आला होता. हा टास्क पूर्ण करताना तिने ३२ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते; मात्र तिला कमिशनची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे तिने साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in