
टी-२० विश्वचषक जवळ आलेला असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचे पाच खेळाडू गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) चिंता वाढली आहे.
चेन्नईकडून १४ कोटी रुपये मिळालेला दीपक चहर आयपीएल खेळणार होता. मात्र तो आयपीएल सुरू होण्याआधीच गंभीर जखमी झाला. तो आयपीएल खेळू शकला नाही. आता टी-२० वर्ल्ड कपपर्यंत देखील तो खेळू शकणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
सूर्यकुमार यादवलाही दुखापत झाली आहे. ६ मे रोजी गुजरात टायटन्सविरुध्द झालेल्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर तो बाहेर झाला. त्याआधीही सूर्यकुमारला दुखापत झाली होती. आता सूर्यकुमारला टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि टी. नटराजन हे तिघेही दुखापतीमुळे टीममधून बाहेर आहेत. यंदा टी-२० वर्ल्ड कपसाठी रोहित अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता असतानाच दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे टीम बाहेर झाल्याने भारताची चिंता वाढली आहे.