कुळगाव बदलापूर नगर परिषद कार्यालयात ध्वजारोहण

संविधानाचे प्रास्ताविक सादर करून हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला
कुळगाव बदलापूर नगर परिषद कार्यालयात ध्वजारोहण

बदलापूर: बदलापुरात ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगर परिषद कार्यालयात तसेच शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमांना हजेरी लावली. स्वातंत्र्य दिनानिमित्त कुळगाव बदलापूर नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

संविधानाचे प्रास्ताविक सादर करून हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगर परिषद शाळेतील माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीतासहित देशभक्तीपर गीत, राज्य गीत, व प्रतिज्ञा सादर केली. शिक्षण विभाग प्रमुख विलास जड्ये यांच्या नियोजनाखाली अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक यावेळी उपस्थित होते. २०४७ पर्यंत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशाचे नागरिक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी व कर्तव्य निभावण्याची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in