हायराईज इमारतीतील आगीवर ‘फोम’चा मारा

गेल्या काही वर्षांत मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हाय राईज इमारतीत आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत.
हायराईज इमारतीतील आगीवर ‘फोम’चा मारा
Published on

मुंबई : हायराईज इमारतीत आगीची घटना घडल्यास आता अडीअडचणीवर मात करत आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. अग्निशमन दलाने कॉम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह ६५ वॉटर मिस्ट सिस्टम्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही सिस्टम पाठीवर घेऊन जाण्यास सोयीस्कर असल्याने घटनास्थळी जवानांना बॅकपॅक मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हाय राईज इमारतीत आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. इलेक्ट्रिक वायरिंग नादुरुस्त असल्याने, योग्य ती खबरदारी न घेतल्याने आगीच्या घटना घडत असतात. अनेक वेळा रासायनिक पदार्थांमुळे अग्निभडका उडतो. रासायनिक पदार्थाला लागलेली आग विझवण्यासाठी कॉम्प्रेस्ड एअर फोमचा वापर केला जातो. कॉम्प्रेस्ड एअर फोमचा वापर अन्य प्रकारच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो. परंतु आता हायराईज इमारतीत आगीच्या घटनास्थळी सहज पोहोचणे शक्य नाही. त्याठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फोमचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पाच लिटरची फोमची बॅग वजनाने हलकी असल्याने जवानांना ती पाठीवर घेऊन जाणे शक्य होणार आहे.

अत्याधुनिक सिम्युलेशन प्रणालीचा वापर!

आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वेगवेगळ्या तीव्रतेच्या आगी, इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये बचावासाठी प्रशिक्षण दिले जाते. मुंबई अग्निशमन दल आता अत्याधुनिक सिम्युलेशन प्रणालीद्वारे प्रशिक्षण देणार आहे.

समुद्रकिनारी जीवरक्षक लवकरच तैनात!

समुद्रकिनारी चौपाट्यांवर बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी सहा जीवरक्षक खरेदी करण्यात येणार आहे. तसेच बॅटरी ऑपरेटेड स्मोक एक्जॉस्टर अँड ब्लोवर्स खरेदी करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in