अंधेरीत जेवणातून विषबाधा : एकाचा मृत्यू

चौघांवर उपचार सुरू
अंधेरीत जेवणातून विषबाधा : एकाचा मृत्यू

मुंबई : अंधेरी येथे जेवणातून पाच जणांना विषबाधा झाली. त्यापैकी रामबाबू फुलंकर यादव (३२) या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्या चार सहकाऱ्यांवर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किसन शाम यादव, श्रवण गणेश यादव, गोविंद गोपणन यादव आणि दीपक गणेश यादव अशी या चौघांची नावे असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

दरम्यान, जेवणाचे नमुने एफएसएल येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. हे पाच जण मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून, अंधेरीतील एमआयडीसी, पंपहाऊसच्या गोपाळ सदन, ब्रह्मदेव यादव चाळीत राहत होते. बुधवारी त्यांच्या घरातून कोणीही बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांचा मित्र फुलो यादव याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी सर्वजण बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने ही माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांना तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे रामबाबू यादव याला डॉ. संकेत यांनी मृत घोषित केले, तर किसन यादव, श्रवण यादव, गोविंद यादव आणि दीपक यादव यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे बोलले जाते. प्राथमिक तपासात जेवणातून या पाच जणांना विषबाधा झाली होती. या सर्वांचे रक्त, उल्टी आणि जेवणाचे नमुने एफएसआय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यांना जेवणातून फंगस इन्फेक्शन झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in