सहा दिवस समुद्राला मोठे उधाण,उंच लाटा उसळणार

समुद्राला भरती असणाऱ्या वेळी मुंबईत अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे.
 सहा दिवस समुद्राला मोठे उधाण,उंच लाटा उसळणार
Published on

मुंबईत उद्यापासून सलग सहा दिवस समुद्राला मोठे उधाण राहणार आहे. यावेळी समुद्रात ४.५ मीटरहून जास्त उंचींच्या लाटा उसळणार आहेत. शिवाय काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देत हवामान खात्यानेही पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. त्यामुळे चौपाट्यांवर येणार्‍या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

समुद्राला भरती असणाऱ्या वेळी मुंबईत अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. शिवाय जोराचे वारे आणि समुद्रात जाणारे पावसाचे पाणी अडल्यास धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. समुद्राच्या उधाणात ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्यास धोक्याचा इशारा दिला जातो. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अशा उसळणार लाटा

१३ जुलै : ४.६८ मीटर (स.११ वाजून ४४ मि.)

१४ जुलै : ४.८२ मीटर (दु.१२ वाजून ३३ मि.)

१५ जुलै : ४.८७ मीटर (दुपारी १ वाजून २२ मि.)

१६ जुलै : ४.८५ मीटर (दुपारी २ वाजून ८ मि.)

१७ जुलै : ४.७३ मीटर (दुपारी २ वाजून ५४ मि.)

१८ जुलै : ४.५१ मीटर (दुपारी ३ वाजून ३८ मि.)

logo
marathi.freepressjournal.in