चौपाट्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दलाचे ४० जवान तैनात

पर्यटकांमध्ये काही अतिउत्साही पर्यटक लाईफ गार्डच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता असते
चौपाट्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 
 अग्निशमन दलाचे ४० जवान तैनात

चौपाट्यांवर होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी आता मुंबई अग्निशमन दलाचे आणखी ४० जवान तैनात करण्यात येणार आहेत. मुंबईतील सात चौपाट्यांवर ९४ लाईफ गार्डची गस्त असून, लाईफ गार्डच्या मदतीसाठी अग्निशमन दलाचे जवान तैनात असतील, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.

गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा सात चौपाट्या आहेत. या चौपाट्यांवर दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटकांमध्ये काही अतिउत्साही पर्यटक लाईफ गार्डच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता असते. दरम्यान, यावर्षी जूनपासून आतापर्यंत विविध चौपाट्यांवर झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेत सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिकेने ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट असलेल्या दिवशी सकाळी १० नंतर चौपाट्यांवर फिरण्यास बंदी घातली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी समुद्रात ४.५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याच्या दिवशी पालिकेकडून धोक्याचा इशारा दिला जातो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in