
जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास १ टक्का वधारला. सेन्सेक्स ४२७ अंकांनी वधारला.
दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ४२७.४९ अंक किंवा ०.८० टक्का वधारुन ५४,१७८.४६ वर बंद झाला. दिवसभरात तो ५०३.८२ अंकांनी वधारुन ५४,२५४.७९ ही कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १४३.१० अंक किंवा ०.८९ टक्का वाढून १६,१३२.९० वर बंद झाला.
सेन्सेक्सवर्गवारीत टायटन, टाटा स्टील, लार्सन ॲण्ड टुब्रो, इंडस्इंड बँक, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या समभागात वाढ झाली. तर डॉ. रेड्डीज लॅब, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि बजाज फायनान्स यांच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारात टोकियो, सेऊल, शांघायमध्ये सकारात्मक वातावरण होते. तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत वाढ झाली होती. अमेरिकन बाजारात बुधवारी तेजी होती.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.०५ टक्का वधारुन प्रति बॅरलचा भाव १००.७ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणू संस्थांनी पुन्हा खरेदी सुरु केल्याने दिलासा मिळाला आहे. विदेशी संस्थांनी बुधवारी ३३०.१३ कोटींच्या समभागांची खरेदी केली.