टिव्ही-एसीच्या आमिषाने फोर्स वनच्या कर्मचाऱ्याची फसवणूक

ही माहिती त्यांनी फोर्स वन आणि राज्य राखीव दलाच्या त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितली होती
टिव्ही-एसीच्या आमिषाने फोर्स वनच्या कर्मचाऱ्याची फसवणूक

मुंबई : टिव्ही एसीच्या आमिषाने फोर्स वनच्या एका पोलीस कर्मचार्‍याची फसवणूक केल्याप्रकरणी जावेद फैमुद्दीन मलिक या भामट्याला वनराई पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याचे इतर दोन सहकारी सहभागी असून, त्यांची नावे हमजा मलिक, अमीर मलिक अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. फोर्स वनमध्ये पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदाराची गेल्या वर्षी मार्च महिन्यांत हमजा नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने ते नामांकित कंपनीचे वस्तू टिव्ही, वॉशिंग मशिन, एसी आदी वस्तू थेट कंपनीतून ग्राहकांना स्वस्तात देत असल्याचे सांगितले होते. मार्केटपेक्षा त्यांना कमी किंमतीत या वस्तू दिल्या जातील, असे सांगून त्याने त्याचा मोबाईल क्रमांक दिला होता. ही माहिती त्यांनी फोर्स वन आणि राज्य राखीव दलाच्या त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितली होती. त्यामुळे त्यांनी हमजाचा परिचित अमीरला गोरेगाव येथील फोर्स वन कार्यालयाजवळ बोलाविले होते. मे २०२२ रोजी तिथे अमीर आला आणि त्याने त्यांचे मालक जावेद यांच्या मदतीने त्यांना सोनी कंपनीचा ४५ हजाराचा टिव्ही ४० हजारात तर ६० हजाराची एसी ५० हजार रुपयांमध्ये देतो असे सांगितले होते.

logo
marathi.freepressjournal.in