उच्च न्यायालयाच्या कोर्ट रूममध्ये मास्कसक्ती,पक्षकाराला दोन हजारांचा दंड ठाेठावला

कोरोनाच्या काळात गेली अडीच वर्षे सर्वत्र मास्कसक्ती करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या कोर्ट रूममध्ये मास्कसक्ती,पक्षकाराला दोन हजारांचा दंड ठाेठावला
Published on

कोरोनाच्या काळात करण्यात आलेली मास्कसक्ती शिथिल करण्यात आली असली, तरी उच्च न्यायालयाच्या कोर्ट रूम नंबर १३मध्ये मात्र ती आजही आहे. तोंडाला मास्क असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कोर्ट रूममध्ये प्रवेश दिला जात नाही. आज त्या भर की काय, एका पक्षकाराचा मोबाइल फोन वाजला आणि मास्कऐवजी नाकावरील रुमाल तोडाच्या खाली आल्याने संतप्त झालेल्या खंडपीठाने पक्षकाराला दोन हजारांचा दंड ठाेठावला. एवढेच नव्हे, तर मोबाइल जप्त करून तो उद्या संध्याकाळी ५ वाजता देण्याचे निर्देश दिले.

कोरोनाच्या काळात गेली अडीच वर्षे सर्वत्र मास्कसक्ती करण्यात आली. त्यानंतर जानेवारी महिन्यात मास्कची सक्ती उठविण्यात आली. उच्च न्यायालयातही ही सक्ती शिथिल करण्यात आली; परंतु कोर्ट नंबर १३मध्ये मात्र मास्कसक्ती कायम ठेवण्यात आली. तसा फलकही कोर्ट रूमच्या बाहेर लावण्यात आला आहे. या कोर्ट रूममध्ये न्यायमूर्ती के. आ. श्रीराम आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना एक पक्षाकार आपला मोबाइल शर्टाच्या खिशात ठेवून बसला होता. त्यावेळी मोबाइल वाजला आणि खंडपीठाचा संताप अनावर झाला. पक्षकाराला समोर बोलून खंडपीठाने चांगलीच कान उघडणी केली.

logo
marathi.freepressjournal.in