
मुंबई : काकीनाडाहून लोकमान्य टिळक टर्मिनसवर आलेल्या एक्सप्रेसमधून रविवारी राज्य उत्पादन शुल्क विभाग व रेल्वे पोलीस फोर्स यांनी संयुक्त कारवाई करून दोन लाख ५६ लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार काकीनाडा एक्सप्रेस मधून चोरून विदेशी दारू येत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार रविवारी सकाळी अकरा वाजता उत्पादन शुल्क विभागाचे पथक लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचले व रेल्वे पोलीस फोर्स मार्फत काकीनाड्यावरून आलेल्या काकीनाडा एक्सप्रेसची तपासणी केली यावेळी त्या डब्यामधून सहा बॅग ताब्यात घेण्यात आल्या. यामध्ये विदेशी वाईन व ब्रांडीच्या बाटल्या होत्या. यात ३१ बॉक्स मधून विदेशी वाईन व ब्रांडी जप्त करण्यात आली. त्याची एकूण किंमत दोन लाख ५६ हजार३७० रुपये होती. याबाबत पुढील तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.