पॅरोलवरील परदेशी नागरिकांना ‘ट्रॅक’ करणार; अमली पदार्थप्रकरणी मुख्यमंत्र्यांची माहिती

अमली पदार्थ प्रकरणांतील पॅरोलवर असलेल्या परदेशी नागरिकांना इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या मदतीने ट्रॅक करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य विधिमंडळात सांगितले.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीससंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : अमली पदार्थ प्रकरणांतील पॅरोलवर असलेल्या परदेशी नागरिकांना इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या मदतीने ट्रॅक करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य विधिमंडळात सांगितले.

अमली पदार्थांचा धोका वाढत आहे हे मान्य करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पूर्वी नायजेरियन तस्कर थेट ड्रग्ज विकत असत. मात्र आता डार्कनेट आणि इन्स्टाग्रामद्वारे संदेश पाठवून ऑर्डर देण्यात येते आणि ड्रग्ज कुरिअर सेवेच्या माध्यमातून वितरीत केली जातात. कुरिअर कार्यालयांची तपासणी करण्यात आली असून त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

फडणवीस यांनी सांगितले की, सरकार नायजेरियन आणि इतर विदेशी नागरिक तस्करांचा मागोवा घेत आहे. आमच्याकडे तुरुंगांशी संबंधित एक कायदा आहे, ज्याअंतर्गत पॅरोल किंवा फरलोवर असलेल्या व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक गॅजेटद्वारे ट्रॅक करण्याची तरतूद आहे. आम्ही कायदेशीर दृष्टिकोनातून मूल्यांकन करत आहोत की अंमली पदार्थ प्रकरणातील परदेशी नागरिकांना इलेक्ट्रॉनिकद्वारे ट्रॅक करता येईल का, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अमली पदार्थांशी थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित आढळलेल्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी हकालपट्टी केली जाईल.

पुण्यात सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in