१.५८ कोटीच्या सोने तस्करीप्रकरणी विदेशी महिलेला अटक

भारतीय बाजारात हे सोने विक्री करून ती पुन्हा नैरोबी येथे जाणार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
१.५८ कोटीच्या सोने तस्करीप्रकरणी विदेशी महिलेला अटक

मुंबई : विदेशातून चोरट्या मार्गाने सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी नजमा शेख मोहम्मद या ३४ वर्षांच्या महिलेस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. तिच्याकडून या अधिकाऱ्यांनी २९५० ग्रॅम वजनाचे २४ कॅरेटचे १६ गोल्ड बार जप्त केले असून त्याची किंमत १ कोटी ५८ लाख १५ हजार रुपये इतकी आहे.

भारतीय बाजारात हे सोने विक्री करून ती पुन्हा नैरोबी येथे जाणार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर तिला किल्ला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नजमा ही मूळची केनियाची नागरिक असून ती रविवारी सकाळी नैरोबी येथून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिच्याकडे गोल्ड बार असल्याची माहिती प्राप्त होताच, हवाई गुप्तचर विभागाने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकाऱ्यांना १ कोटी ५८ लाख रुपयांचे गोल्ड बार सापडले. चौकशीदरम्यान तिने नैरोबी येथे एका महिलेकडून उधारीवर गोल्ड बार घेतले होते. त्याची ती भारतातील मार्केटमध्ये विक्री करून नफा कमविण्यासाठी आली होती. मात्र गोल्ड बारची विक्री करण्यापूर्वीच तिला तुरुंगात जावे लागले. सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक केल्यानंतर तिला रविवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in