ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्सचा क्वीन्सलँडच्या कार अपघातात मृत्यू

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्सचा क्वीन्सलँडच्या कार अपघातात मृत्यू

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्सचा क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्स स्वतः कार चालवत होते. अचानक त्याची कार रस्ता सोडून उलटली. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन सेवांनी सायमंडला वाचवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. हा अपघात कसा झाला, याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांनी एका निवेदनातून दिली आहे.

ॲण्ड्रयू सायमंड्स हा दोन वेळा विश्वकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये सहभागी होता. सायमंड्स‌ ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळ, तर १९८ एकदिवसीय सामने खेळला आहे. यामध्ये त्याने सहा शतक आणि ३० अर्धशतक लगावली तर गोलंदाजी करताना त्याने एकदिवसीय सामन्यात १३३ विकेट्स घेतल्या. १९९९-२००७ च्या क्रिकेट विश्वावर राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. संघ सहकाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूच्या वृत्तावर माजी यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्टने शोक व्यक्त केला. या वृत्ताने खूप दुःखी झालोय, असं गिलख्रिस्टने ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘‘सायमंड्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. रॉड मार्श आणि शेन वॉर्नसारख्या खेळाडूंच्या निधनानंतर सायमंड्सचे या वर्षी निधन होणे अत्यंत क्लेशदायक आहे. क्रिकेटसाठी हा आणखी एक दुःखाचा दिवस आहे,’’ असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटले आहे. मैदानावर आणि त्यापलीकडेही आमचे सुंदर नाते होते, असे पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने ट्विटमध्ये म्हटले आहे.

२००३ च्या विश्वकप स्पर्धेत जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तान विरोधात केलेली १४३ धावांची खेळी लक्षात राहिली. याशिवाय भारताविरुद्धच्या अंतिम फेरीतील सामन्यातदेखील त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण राहिली. २००७ च्या वेस्ट इंडिजमधील वर्ल्डकपमध्येदेखील महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग याच्याशी सायमंड्स‌‌चा झालेला क्रिकेटविश्वात गाजला होता. तो इंडियन प्रीमियर लीगमध्येही चार वर्षे खेळला होता. २००९ ला ॲडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जर्स संघाने आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्या विजयात सायमंड्स‌चा महत्त्वाचा वाटा राहिला होता. नंतर तो मुंबई इंडियन्स संघाकडूनही खेळला. २०१२ मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in