माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

राज्‍यात सत्‍तांतर झाल्‍यानंतर विरोधी पक्षनेतेपदी कोण येणार याची चर्चा होती.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्‍याची घोषणा केली. सत्तांतरानंतर राष्‍ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष असल्‍याने पक्षाने या पदावर अजित पवार यांची निवड करण्यात यावी, असे पत्र अध्यक्षांना दिले होते.

 राज्‍यात सत्‍तांतर झाल्‍यानंतर विरोधी पक्षनेतेपदी कोण येणार याची चर्चा होती. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्‍या बैठकीत अजित पवार यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले होते. त्‍यानुसार सोमवारी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देण्यात आले. त्‍यानुसार अध्यक्षांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली.  अजित पवार यांना विरोधीपक्षनेतेपदाची धुरा देण्यात आल्‍याने आता विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार असा सामना रंगणार आहे.

अजित पवार यांचा अनुभव दांडगा आहे. प्रशासनाची खडा न खडा माहिती त्‍यांना आहे. स्‍वतः अर्थमंत्री राहिल्‍याने त्‍यांना अर्थसंकल्‍पाची अचूक माहिती आहे. राज्‍य सरकारला ते प्रत्‍येक मुददयावर धारेवर धरू शकतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in