माजी आयपीएस अधिकारी डॉ. प्रताप दिघावकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोदींच्या नेतृत्वात देशाला मजबूत करण्यासाठी आणि भारत आत्मनिर्भर होण्यासाठी ते भाजपमध्ये आले आहेत
माजी आयपीएस अधिकारी डॉ. प्रताप दिघावकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी डॉ. प्रताप दिघावकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ''आज माजी आयपीआय आणि पोलीस अधिकारी प्रतापराव दिघावकर यांचा पक्षप्रवेश हजारो कार्यकर्त्यांसोबत झाला आहे. दिघावकर यांनी संकल्प केला आहे की, मोदींच्या नेतृत्वात देशाला मजबूत करण्यासाठी आणि भारत आत्मनिर्भर होण्यासाठी ते भाजपमध्ये आले आहेत."

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी डॉ. प्रताप दिघावकर म्हणाले की, “देशातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आणि आपल्या जीडीपीमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे मी भाजपच्या कामातून प्रभावित झालो आहे. भारताला पूर्वी सॉफ्टस्टेट म्हटले जायचे. आता सर्जिकल स्ट्राईकमुळे आपण अधिक मजबूत झालो असून, देशाची पूर्वीची प्रतिमा बदलली आहे.”

कोण आहेत प्रताप दिघावकर?

नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील प्रताप दिघावकर हे १९८७ मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिसात रुजू झाले. पुढे २००१ मध्ये त्यांची आयपीएस म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी पुणे आणि रायगड जिल्ह्यांत पोलीस अधीक्षक, झोनसाठी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून काम केले. वाहतूक पोलीस आणि मुंबई (दक्षिण) येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. महानिरीक्षकपदी बढती झाल्यानंतर त्यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in