माजी आमदार रमेश कदम अधिवेशनाला नागपूरला जाण्यास परवानगी

न्यायाधीश राहुल रोकडे यांनी कदत यांना १४ ते २१ डिसेंबर या अवधीत विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला जाण्यास परवानगी दिली.
माजी आमदार रमेश कदम अधिवेशनाला नागपूरला जाण्यास परवानगी
Published on

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरणातील जामीनावर असलेला प्रमुख आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना विशेष सत्र न्यायालयाने दिलासा दिला. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी कदत यांना १४ ते २१ डिसेंबर या अवधीत विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला जाण्यास परवानगी दिली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास मंडळाला देण्यात आलेला सुमारे ३१२ कोटीचा निधी मंळडाचे चेअरमन या नात्यांने रमेश कदम यांनी परस्पर आपल्या खात्यात वळवून भ्रष्टाचार केल्याच्या आरोप ठेवून सीआयडीने ऑगस्ट २०१५ मध्ये अटक केली. त्यानंतर आठ वर्षांनी अलीकडेच २०२३ ला अखेर जामीनावर सुटका झाली. न्यायालयाने जामीन मंजूर करताना मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली होती.

दरम्यान कदम यांच्या वतीने हिवाळी अधिवेशनात विधीमंडळ सभागृहाच्या बाहेर राहून जनतेच्या प्रश्नांसंबंधी लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त करीत नागपूरला जाण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज अ‍ॅड. प्रशांत राऊळ यांनी केला. त्या अर्जावर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने अर्जाची रमेश कदम यांना १४ ते २१ डिसेंबर या कालावधीत जामीन अटी-शर्तींचे पालन करण्याचे निर्देश देत मुंबईबाहेर जाण्यास परवानगी दिली.

logo
marathi.freepressjournal.in