माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

देशमुख यांना जामीन मिळाल्याने त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग सोपा झाला आहे. या पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ही भेट महत्त्वाची
File Photo
File Photo

मुंबईचे वादग्रस्त माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ बंगल्यावर ही भेट घेतली. या भेटीत १५ ते २० मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा कोणत्या विषयावर झाली याची माहिती मिळू शकली नाही.

परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांना जामीन मिळाल्याने त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग सोपा झाला आहे. या पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे आता पुन्हा अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गेले अनेक दिवस गायब असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाची सुनावणी झाल्यावरच दिसून आले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. इतकेच नाही तर, या प्रकरणात देशमुखांना ११ महिने जेलमध्ये रहावे लागले आहे. तर या सर्व प्रकरणात परमबीर सिंह यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता परमबीर सिंह पुन्हा कमबॅक करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in