माजी क्रीडा राज्यमंत्र्यांना झाली दोन वर्षांची शिक्षा

पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलिसांनी गावंडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला
माजी क्रीडा राज्यमंत्र्यांना झाली दोन वर्षांची शिक्षा

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना सत्र न्यायालयाने शनिवारी दोन वर्षांची शिक्षा व सात हजार रुपये दंड ठोठावला. तब्बल २३ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. गावंडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत.

अकोल्यातील अग्रसेन चौकात तैनात असलेले वाहतूक पोलीस संतोष गिरी यांच्याशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी, पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलिसांनी गावंडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. गव्हाणे यांनी सबळ पुरावे व साक्षीदारांच्या आधारे गावंडे यांना कलम ३५३ अन्वये दोन वर्षांची शिक्षा, पाच हजार दंड व कलम २९४ अन्वये २ हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in