मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे निधन

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे सोमवारी सकाळी येथे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे निधन
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे सोमवारी सकाळी येथे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि शिक्षण पद्धतीमध्ये नवे बदल स्वीकारणाऱ्या कुलगुरू म्हणून त्यांची ख्याती होती.

विख्यात बालरोग शल्यचिकित्सक असलेल्या डॉ. स्नेहलता देशमुख यांची ‘दुग्धपेढी’ ही संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात सदैव स्मरणात राहणारी आहे. त्याचप्रमाणे डॉ. देशमुख यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या क्षेत्रातही महत्त्वाचे कार्य केले आहे. लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाता हे पदही त्यांनी भूषविले होते, तर १९९५ मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली होती.

विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीच्या प्रमाणपत्रावर वडिलांप्रमाणेच आईचेही नाव असले पाहिजे, हा निर्णय डॉ. देशमुख यांनी घेतला होता. गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार या पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. सामाजिक कार्यासाठी त्यांना डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार आणि धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या कार्यरत होत्या.

logo
marathi.freepressjournal.in