एमडी आणि गांजा तस्करीप्रकरणी चौघांना अटक

पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी तिथे इगवे जॉन हा नायजेरियन नागरिक आला होता.
एमडी आणि गांजा तस्करीप्रकरणी चौघांना अटक

मुंबई : एमडी आणि गांजा तस्करीप्रकरणी एका विदेशी नागरिकासह चौघांना गुन्हे शाखेसह जुहू एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दोन विविध कारवाईत अटक केली. या चारही आरोपींकडून पोलिसांनी ४ कोटी ६१ लाख ५० हजार रुपयांचा एमडी आणि गांजाचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून, याच गुन्ह्यांत ते सर्वजण पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुहू येथील जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलजवळ काही विदेशी नागरिक येणार आहे. या विदेशी नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा असून, त्याची खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती जुहू एटीएसला मिळाली होती. पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी तिथे इगवे जॉन हा नायजेरियन नागरिक आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in