कृत्रिम पावसासाठी चार कंपन्यांचा प्रतिसाद; जागतिक पातळीवर प्रतिसाद न मिळाल्याने आठवड्याची मुदतवाढ

पालिकेने नियमावली जाहीर करूनही अनेक बांधकामांच्या ठिकाणी नियमावली पाळली जात नसल्याचे समोर आले आहे
कृत्रिम पावसासाठी चार कंपन्यांचा प्रतिसाद;
जागतिक पातळीवर प्रतिसाद न मिळाल्याने आठवड्याची मुदतवाढ
PM

मुंबई : प्रदूषणमुक्तीसह धुळीचे कण हवेत पसरू नयेत, यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी जागतिक पातळीवर ‘एक्स्प्रेस ऑफ इंटरेस्ट’ मागवण्यात आल्या. मात्र ‘एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट’ला चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून जागतिक पातळीवर विदेशी कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्याने ‘स्वारस्य अभिरूची’साठी आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले

गेल्या दोन महिन्यांपासून हवेतील गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणात वाढ झाली. मुंबईत ६००० बांधकामे सुरू असून प्रदूषणास धूळ कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पालिकेने बांधकाम ठिकाणी २७ प्रकारची नियमावली २३ ऑक्टोबरला जारी केली. तसेच धुळीमुळे हवेची गुणवत्ता खालावत असून धुळीचे कण हवेत पसरू नयेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृत्रिम पाऊस पडण्याची सूचना केली. त्यानुसार मुंबई महापालिकेने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी जागतिक पातळीवर ‘एक्स्प्रेस ऑफ इंटरेस्ट’ मागवण्यात आल्या. मात्र त्याला चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. जागतिक पातळीवर ‘एक्स्प्रेस ऑफ इंटरेस्ट’ला चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याने विदेशी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तंत्रज्ञान समजून घेणार!

पालिकेने मागवलेल्या स्वारस्य अभिरूची कंपन्यांकडून त्यांचे कृत्रिम पावसाबाबतचे तंत्रज्ञान समजावून घेतले जाणार आहे. यानंतर पात्र ठरणारे तंत्रज्ञान निश्चित झाल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत. यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहेत. यामध्ये ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ १०० पर्यंत असल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याची गजर पडणार नाही. ‘एक्यूआय’ वाढल्यास कृत्रिम पाऊस पाडला जाईल, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

८००हून बांधकामांना ‘स्टॉप वर्क नोटीस’

पालिकेने नियमावली जाहीर करूनही अनेक बांधकामांच्या ठिकाणी नियमावली पाळली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व वॉर्डांमध्ये पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. यामध्ये आतापर्यंत केलेल्या तपासणीत सर्व २४ वॉर्डमध्ये ८००हून अधिक बांधकामांना ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात आली आहे. तर सुमारे ६०० बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in