दिवाळीला चार दिवस, बोनस कधी ;पालिकेसह बेस्टच्या कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा

पालिका व बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी २२ हजार ५०० रूपये दिवाळी बोनस देण्यात आला होता.
दिवाळीला चार दिवस, बोनस कधी ;पालिकेसह बेस्टच्या कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा

मुंबई : दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र मुंबई महापालिकेसह बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी २२ हजार ५०० रुपये देणार की वाढ होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईबाहेर असल्याने निर्णय प्रलंबित असल्याचे समजते.

पालिका व बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी २२ हजार ५०० रूपये दिवाळी बोनस देण्यात आला होता. कामगार संघटनांनी यंदा २० टक्के म्हणजे ४० ते ५० हजार रुपये बोनसची मागणी केली आहे. गेल्यावर्षी बोनसच्या रकमेत अडीच हजार रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे २२ हजार ५०० रुपये इतका बोनस मिळाला होता. यंदाही तितकीच वाढ मिळाल्यास २५ हजारांपर्यंत बोनस जाऊ शकेल, अशी आशा कामगार संघटनांना वाटते आहे. दिवाळीला चार दिवस शिल्लक असून बोनसचे पैसे वेळेत बँक खात्यात जमा झाले तर दिवाळीची खरेदी करता येईल, असे कामगारांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in