गुजरातमध्ये रानडुकराला धडकून चौघांचा मृत्यू

मृतांचे मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आले आणि सांतालपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले
गुजरातमध्ये रानडुकराला धडकून चौघांचा मृत्यू

मुंबई : गुजरातच्या पाटण जिल्ह्यात बुधवारी रस्ता ओलांडणाऱ्या रानडुकराला धडकल्यानंतर एक मोटार रस्त्याच्या बाजूला असलेल्या व पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका कुटुंबातील ४ जण बुडून मरण पावले.

कुटुंबातील एक जोडपे आणि त्यांची दोन अल्पवयीन मुले यात बुडाली, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना पाटणच्या सांतालपूर तालुक्यातील फांगली गावाजवळ सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. सर्व मृत हे फांगली येथील होते, अशी  माहिती पोलीस उपअधीक्षक हरदेवसिंह वाघेला यांनी दिली.

हे कुटुंब कच्छ जिल्ह्यात एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असताना महामार्ग ओलांडणाऱ्या रानडुकराला त्यांची मोटार धडकल्याने कार चालवणाऱ्या व्यक्तीचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यामुळे ती मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला. काही स्थानिकांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. मृतांचे मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आले आणि सांतालपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये एक मुलगा व एक मुलगी असून ते दोघे १२ ते १५ वयोगटातील आहेत. पोलिसांनी सांगितले की, चार बळींचा बुडून मृत्यू झाला आहे, परंतु शवविच्छेदन अहवालात नेमके कारण स्पष्ट होईल.

logo
marathi.freepressjournal.in