कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिमपर्यंत उड्डाणपूल; चार लेनच्या उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी फुटणार; BMC अडीच हजार कोटी रुपये खर्च करणार

मुंबई उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाचे जाळे विस्तारले जात आहे. यात लालबहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिम येथील पंखेशाह बाबा दर्गापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी विविध करासह अडीच हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिमपर्यंत उड्डाणपूल; चार लेनच्या उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी फुटणार; BMC अडीच हजार कोटी रुपये खर्च करणार
कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिमपर्यंत उड्डाणपूल; चार लेनच्या उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी फुटणार; BMC अडीच हजार कोटी रुपये खर्च करणारप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाचे जाळे विस्तारले जात आहे. यात लालबहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिम येथील पंखेशाह बाबा दर्गापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी विविध करासह अडीच हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ४ लेनचा हा उड्डाणपूल असेल, ज्यामध्ये दुहेरी वाहतूक असेल ज्यामुळे या पट्ट्यात होणारी वाहतूककोंडी फुटणार आहे.

मुंबईतील वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत असून विशेषतः मुंबई उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुलांचे जाळे विणले जात आहे. कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिम लालबहादूर शास्त्री मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. लालबहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

येणार २,५६० कोटी रुपयांचा खर्च

एलबीएस महामार्गावरील जंक्शनवर वाहतूककोंडी निर्माण होते. या ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवासाचा वेळ, इंधनाच्या खर्चातही वाढ होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि कोंडी सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या उद्देशाने लालबहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला पश्चिम कल्पना टॉकीज येथून घाटकोपर पश्चिम पंखेशाह बाबा दर्ग्यापर्यंत विद्यमान एलबीएस रस्त्यावर ४ मार्गिकांचा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. पुलाच्या बांधकामाचा खर्च विविध करांसह २,५६० कोटी रुपये एवढा आहे. यासाठी आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in