एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन विदेशींसह चौघांना अटक

एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन विदेशींसह चार आरोपींना गुन्हे शाखेसह अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली.
एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन विदेशींसह चौघांना अटक

मुंबई : एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन विदेशींसह चार आरोपींना गुन्हे शाखेसह अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. या चारही आरोपींकडून पोलिसांनी १ किलो ९७ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला असून, त्याची किंमत एक कोटी २१ लाख रुपये आहे. या चौघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, याच गुन्ह्यात त्यांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरीतील वर्सोवा परिसरात एमडी ड्रग्जची खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती युनिट आठच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकातील मधुकर धुतराज, राहुल प्रभू, संग्राम पाटील, अरविंद मोरे, अंमलदार यादव, किणी, काकडे, कुरकुटे, रहेरे, सटाले, गायकवाड यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी आलेल्या महेंद्र चंद्र गिरी आणि सय्यद मुर्तेझा सय्यद रेझा फाहमी या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे पोलिसांना १०२० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून, त्याची किंमत दोन कोटी चार लाख रुपये इतकी आहे. दुसर्‍या कारवाईत घाटकोपर युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अन्य दोन नायजेरीयन नागरिकांना अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in