पाण्याच्या टाकीत गुदमरून चार कामगारांचा मृत्यू; नागपाडा येथील धक्कादायक घटना, चौकशीनंतर पुढील कारवाई - अश्विनी जोशी

नागपाडा येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीतील बेसमेंटमध्ये असलेली पाण्याची टाकी साफ करण्यासाठी पाच कामगार उतरले असता विषारी वायूमुळे गुदमरून पाचपैकी चार कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.
पाण्याच्या टाकीत गुदमरून चार कामगारांचा मृत्यू; नागपाडा येथील धक्कादायक घटना,  चौकशीनंतर पुढील कारवाई - अश्विनी जोशी
एक्स @abuasimazmi
Published on

मुंबई : नागपाडा येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीतील बेसमेंटमध्ये असलेली पाण्याची टाकी साफ करण्यासाठी पाच कामगार उतरले असता विषारी वायूमुळे गुदमरून पाचपैकी चार कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या दुर्घटनेबाबत प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.

नागपाडा मिंट रोड, गुड लक मोटर ट्रेनिंग स्कूलजवळ ‘बिस्मिल्लाह स्पेस’ या २० मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाण्याची टाकी असून ती साफ करण्यासाठी एक कामगार रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास टाकीत उतरला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने अन्य चार कामगार या अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी टाकीत उतरले. मात्र, टाकीतील विषारी वायूमुळे हे चारही कामगार गुदमरून गेले. टाकीत अडकलेल्या या पाचही कामगारांना मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आणि त्यांना जवळील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, पाचपैकी चार कामगारांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या चार कामगारांचा मृत्यू

हासिपल शेख (१९), राजा शेख (२०), जियाउल्ला शेख (३६) व इमांदू शेख (३८) या चार कामगारांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला, तर पुरहान शेख (३१) या जखमी कामगारावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in