मुंबईत जुलै महिन्यात चौथी लाट येण्याची शक्यता ;आयआयटी कानपूरचा इशारा

मुंबईत जुलै महिन्यात चौथी लाट येण्याची शक्यता ;आयआयटी कानपूरचा इशारा

आयआयटी कानपूरच्या अहवालानुसार मुंबईत जुलै महिन्यात चौथी लाट येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाटेचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता खबरदारी म्हणून जम्बो कोविड सेंटर सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांनी सांगितले. दरम्यान, तीन कोविड सेंटर बंद करण्यात आले असले तरी उर्वरित सात जम्बो कोविड सेंटर सुरू राहणार असून, १५ हजार बेड्स अॅक्टिव्ह ठेवण्यात येणार असल्याचे चहल यांनी सांगितले.

आयआयटी कानपूर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जुलै महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज आहे, म्हणूनच मुंबईतील कोरोना रुग्णांवर उपचार करणारी जम्बो कोविड सेंटर येत्या सप्टेंबरपर्यंत कायम ठेवणार असल्याची माहिती चहल यांनी दिली. मुंबईत सध्या ७३ हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत, त्यामध्ये जम्बो कोविड सेंटरचाही समावेश आहे.

मुंबईत जम्बो कोविड सेंटरची सुविधा बीकेसी १, बीकेसी -२ तसेच वरळी येथे आहे. आयआयटी कानपूरने कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तूर्तास मास्कसक्ती काढण्यात आलेली असली, तरीही येत्या काळात याबाबतचा निर्णय योग्य वेळी घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in