मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा चढ-उतार ; कोरोनाचे १,८९९ नवे रुग्ण

मुंबईत सध्या १३ हजार २५७ सक्रिय रुग्ण आहेत
मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा चढ-उतार ; कोरोनाचे १,८९९ नवे रुग्ण

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा चढ-उतार पहावयास मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात १,८९८ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ३ हजार ७६० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५९१ वर पोहोचली आहे. दिवसभरात २,२५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ७० हजार ९१२ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या १३ हजार २५७ सक्रिय रुग्ण आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in