एफपीजे इको गणेश बीएमसी अवॉर्ड २०२३ : विजेत्यांचा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गौरव

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबांना तसेच गणेशोत्सेव मंडळांना सलग चौथ्या वर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
एफपीजे इको गणेश बीएमसी अवॉर्ड २०२३ : विजेत्यांचा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गौरव

मुंबई: एफपीजे इको गणेश बीएमसी अवॉर्ड २०२३च्या पुरस्कार विजेत्यांना गेल्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गौरवण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबांना तसेच गणेशोत्सेव मंडळांना सलग चौथ्या वर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी एफपीजे समूहाने बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्याशी सहकार्य करार केला आहे. या उपक्रमाला इंडियन ऑईल, रेड एफएम ९३.५ तसेच प्रिंट मीडिया पार्टनर ‘नवशक्ति’चेही सहकार्य लाभले.

अभिनेता अजिंक्य देव, अभिनेत्री स्मिता गोंदकर या प्रमुख पाहुण्यांसह, बीएमसीचे उपायुक्त रमाकांत बिरादार, सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे संचालक राजीव मिश्रा आणि फ्री प्रेस जर्नल ग्रूप ऑफ न्यूजपेपर्सचे अध्यक्ष अभिषेक कर्नानी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शंकर महादेवन अकादमीची २२ वर्षीय विद्यार्थी जान्हवी लक्ष्मीनारायणन हिच्या गणेशवंदनाने तसेच देवी नृत्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in