ऑनलाईन टास्कवर कमिशनचे आमिष दाखवून फसवणूक

याप्रकरणी विक्रोळीसह वर्सोवा आणि वनराई पोलिसांनी तीन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.
ऑनलाईन टास्कवर कमिशनचे आमिष दाखवून फसवणूक
Published on

मुंबई : ऑनलाईन टास्कवर कमिशनचे गाजर दाखवून पार्टटाईम जॉबच्या नावाने एका तरुणीसह तिघांची फसवणूक झाली आहे. या तिन्ही गुन्ह्यांत अज्ञात सायबर ठगाने सुमारे पावणेबारा लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी विक्रोळीसह वर्सोवा आणि वनराई पोलिसांनी तीन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेल पोलिसांकडून सुरू आहे. ३० वर्षांची तरुणी ही विकोळी परिसरात राहत असून, ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर कालावधीत तिला ऑनलाईन टास्क देऊन जास्त कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानंतर तिची प्रिपेड टास्कद्वारे दोन लाख अठरा हजाराची फसवणूक झाली होती. दुसऱ्या घटनेतील वयोवृद्ध अंधेरी परिसरात राहत असून, ऑक्टोबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने पार्टटाईम जॉबची ऑफर देत त्यांना एका टैलिग्राम ग्रुपमध्ये सामिल केले होते. त्यात त्यांना विविध टास्कद्वारे कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. दुसऱ्या घटनेत एका २७ वर्षांच्या तरुणाची अज्ञात सायबर ठगाने फसवणूक केली.

logo
marathi.freepressjournal.in