तुमच्या मुलाने लैंगिक अत्याचार केलाय...वडिलांना फोन करून उकळले 1.25 लाख रुपये

रविवारी दुपारी वडील एका शाळेत जेवण बनविण्याचे काम करत होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने फोन केला....
तुमच्या मुलाने लैंगिक अत्याचार केलाय...वडिलांना फोन करून उकळले 1.25 लाख रुपये

मुंबई : तुमच्या मुलाने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला असून, त्याला पोलिसांकडून सोडवण्यासाठी एका ५५ वर्षांच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने सुमारे सव्वालाखांची फसवणूक केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अज्ञाताने मुलाच्या सुटकेसाठी चार लाखांची मागणी करून सव्वालाख रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

यातील तक्रारदार घाटकोपर येथे त्यांच्या पत्नी, चार मुले आणि सूनांसोबत राहतात. ते जेवण बनविण्याचे काम करत असून, त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालतो. रविवारी दुपारी ते एका शाळेत जेवण बनविण्याचे काम करत असताना, एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तुमच्या मुलाने लैगिंक अत्याचार केला असून, त्याला पोलीस ठाण्यात आणले आहे. प्रकरण मिटविण्यासाठी त्याने त्यांच्याकडे चार लाखांची मागणी केली होती. मात्र घरी शहानिशा न करताच, त्यांनी दिलेल्या बँक खात्यात सुमारे सव्वालाख रुपये पाठविले होते. काही वेळाने घरी आले असता, मुलाने कोणतेही कृत्य केले नसल्याचे समोर आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in