विक्रोळीत रुमसाठी दहा लाखांचा अपहार करून फसवणूक

. गेल्या तीन वर्षांपासून तो त्याच्या कुटुंबीयांसोबत भाड्याच्या रुममध्ये राहत होता
विक्रोळीत रुमसाठी दहा लाखांचा अपहार करून फसवणूक

मुंबई : विक्रोळीत रुमसाठी दहा लाखांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी एका कुटुंबातील तिघांविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ममता कृष्णा शेट्टी, कृष्णा देहू शेट्टी, प्रथमेश कृष्णा शेट्टी अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. विक्रोळी येथे राहणारा राकेश जयप्रकाश मौर्या हा बिगारी कामगार आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो त्याच्या कुटुंबीयांसोबत भाड्याच्या रुममध्ये राहत होता. त्यामुळे त्याला त्याच्या बजेटमध्ये म्हणजेच दहा ते अकरा लाखांमध्ये एक रुम खरेदी करायचा होता.

यावेळी ज्योती नंदरगिरी या महिला एजंटने त्यांची जानेवारी २०२१ रोजी ममता, तिचा पती कृष्णा आणि मुलगा प्रथमेश यांच्याशी ओळख करून दिली होती. या तिघांची विक्रोळीतील पार्कसाईट, अप्पर डेपो पाडा, तनया सोसायटीमध्ये एक रुम होता. पैशांची गरज असल्याने त्यांना या रुमची विक्री करायची होती. त्यामुळे त्याने त्यांच्याशी रुमच्या खरेदी-विक्रीसंदर्भात चर्चा सुरू केली होती. यावेळी त्यांच्यात अठरा लाखांमध्ये रुमचा सौदा पक्का झाला होता. त्यापैकी दहा लाख रुपये त्याने शेट्टी कुटुंबियांना दिले तर उर्वरित रक्कमेचा तो कर्ज घेणार होता. त्यानंतर त्यांच्यात रुमचा एक करार झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in