फ्लॅटसाठी घेतलेल्या दिड कोटींचा अपहार करून फसवणूक

मालाड येथे त्यांच्या मालकीचे तीन फ्लॅट असून त्यातील एक फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्‍वासन दिले होते.
फ्लॅटसाठी घेतलेल्या दिड कोटींचा अपहार करून फसवणूक
Published on

मुंबई : फ्लॅटसाठी घेतलेल्या दिड कोटीचा अपहार करुन एका वकिलासह चारजणांची फसवणूक करून पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस पाच महिन्यानंतर मालाड पोलिसांनी अटक केली. सलीम कासम वाला ऊर्फ सलीम पटला असे या आरोपीचे नाव असून, पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मालाड येथे राहणारे अतुलकुमार प्रभाकर मानकामे हे व्यवसायाने वकिल आहेत. सलीम आणि आसिफ कुरेशी हे चुलत बंधू असून त्यांना ते गेल्या चार वर्षांपासून ओळखतात. त्यांच्या मालकीची गोरेगाव परिसरात एक जागा होती, या जागेसंदर्भात ते त्यांच्याकडे येत होते. त्यांच्या बोलण्यातून त्यांचे मिररोड, मालाड, ठाण्यातील शहापूर, दक्षिण मुंबईतील विविध प्रोजेक्टमध्ये फ्लॅट असल्याचे समजले होते. त्यांच्या बहिणीला एक फ्लॅट विकत घ्यायचा होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांनी त्यांना मालाड येथे त्यांच्या मालकीचे तीन फ्लॅट असून त्यातील एक फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्‍वासन दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in