इलेक्ट्रॉनिक साहित्याचा अपहार करून फसवणूक

कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते
इलेक्ट्रॉनिक साहित्याचा अपहार करून फसवणूक
Published on

मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचा अपहार करून पेमेंट न देता कांदिवलीतील एका व्यावसायिकाची दोन व्यावसायिकाने फसवणूक केली असून, या दोन्ही व्यावसायिकाविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. विक्रम ओमप्रकाश श्रीवास्तव ऊर्फ विकी आणि दर्शन भरतकुमार चुडघर अशी या दोघांची नावे असून, पळून गेलेल्या या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तक्रारदार यांचा आयटी हार्डवेअर-सॉफ्टवेअर साहित्य विक्रीचा व्यवसाय असून, कांदिवली परिसरात त्यांची एक कंपनी आहे.

काही महिन्यांपूर्वी त्यांनी पद्मावती इंटरप्रायजेस कंपनीचे मालक असलेले विक्रम श्रीवास्तव आणि दर्शन चुडघर यांना १ कोटी ५४ लाख ३८ हजाराचे विविध कंपनीचे लॅपटॉप, संगणक, हिकव्हिजन सीसीटिव्ही कॅमेरा, डीव्हीआर, एनव्हीआर, स्टोरेज, हार्ड ड्राईव्ह आदी साहित्य पाठवून दिले होते. त्यापैकी ३६ लाख ७७ हजार रुपयांचे पेमेंट कंपनीने केले; मात्र उर्वरित रक्कमेचे एक कोटी सतरा लाख रुपयांचे धनादेश बँकेत न वटता परत आले होते.

याबाबत कंपनीने विक्रम श्रीवास्तव आणि दर्शन चुडघर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.

logo
marathi.freepressjournal.in