नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून फसवणूक

नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. नोकरीसाठी त्यांच्याकडून विविध कारणासाठी साडेआठ लाख रुपये घेण्यात आले होते.
नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून फसवणूक

मुंबई : मर्चंट नेव्हीच्या नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपीविरुद्ध वडाळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अंकित सिंग आणि विकास ठाकूर अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही फरार असून, त्यांच्या अटकेसाठी स्थाकिनक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. अॅण्टॉप हिल येथे कुटुंबीयांसोबत राहणारा २६ वर्षांच्या तरुणाला फेब्रुवारी महिन्यात गुगलवर मर्चंट नेव्हीची एक जाहिरात दिसली होती. नोकरीच्या प्रयत्नात असल्याने त्याने जाहिरातीमध्ये दिलेल्या अंकित सिंगला संपर्क साधला होता. त्यानंतर त्याला नवी मुंबईतील कार्यालयात बोलाविण्यात आले होते. तिथे तो त्याच्या मित्रासोबत गेला होता. यावेळी त्यांना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. नोकरीसाठी त्यांच्याकडून विविध कारणासाठी साडेआठ लाख रुपये घेण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in