बँकेच्या नावाचा दुरुपयोग करून फसवणूक; त्रिकुटास अटक

तिघांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सहाजणांना बँकेतून विविध कर्ज देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
बँकेच्या नावाचा दुरुपयोग करून फसवणूक; त्रिकुटास अटक

मुंबई : बँकेच्या नावाचा दुरुपयोग करून फसवणूक करणाऱ्या एका त्रिकुटाला बीकेसी पोलिसंनी अटक केली. दिपक बाबूलाल मुनी, मनिष सुधीर भगत आणि पंकज सबुजीत यादव अशी या तिघांची नावे आहे. या तिघांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सहाजणांना बँकेतून विविध कर्ज देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांतील पळून गेलेल्या आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार एका खाजगी बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. फेब्रुवारी महिन्यांपासून अज्ञात व्यक्तींकडून काही लोकांना कॉल करुन ते संबंधित बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांना कर्जाची आवश्यकता आहे का याबाबत विचारणा केली जात होती. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्यांना बँकेचे आयडी कार्ड आणि कर्ज मंजूर झाल्याचे पत्र पाठविले होते. त्यांच्या खात्यात लवकरच कर्जाची रक्कम जमा होईल असे सांगून त्यांना विविध प्रोसेसिंग फी म्हणून पैसे जमा करण्यास प्रवृत्त केले जात होते. गेल्या काही महिन्यांत संबंधित व्यक्तींनी हरिश विष्णू खवळे, अवनिश राज नारायणकुमार, प्रमोद पाटील, अतुल शरद मुजुमदार, संजय खेडसकर, इशा कमलेश मराठे यांच्याकडून कर्जासाठी २ लाख ६६ हजार ५०५ रुपये ऑनलाईन घेतले होते; मात्र त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. त्यामुळे संबंधित सहाजणांनी बँकेत विचारणा केली होती.

हा प्रकार समजताच बँकेने त्याची शहानिशा सुरू केली होती. अज्ञात व्यक्तींनी बँकेच्या नावासह बोगस आयडी कार्डचा वापर करुन संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना कर्जाच्या नावाने ऑनलाईन गंडा घातला होता.

logo
marathi.freepressjournal.in