शेअरमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

हवालदाराच्या तक्रारीवरुन जोगेश्‍वरी पोलिसांनी सलील सदानंद सांबारी आणि विद्याधर विष्णू शिरोडकर या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
शेअरमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

मुंबई : शेअरमधील गुंतवणुकीवर दरमाह दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी सुमारे पंधरा लाखांची फसवणूक झाली असून, त्यात एका पोलीस हवालदाराचा समावेश आहे. याप्रकरणी या हवालदाराच्या तक्रारीवरुन जोगेश्‍वरी पोलिसांनी सलील सदानंद सांबारी आणि विद्याधर विष्णू शिरोडकर या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे विद्याधर हा पोलीस हवालदाराचा बालपणीचा मित्र असून, त्याने सलीलच्या मदतीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ५२ वर्षांचे तक्रारदार पोलीस हवालदार असून, सध्या त्यांची नेमणूक संरक्षण आणि सुरक्षा विभागाात आहे. विद्याधर हा त्यांचा बालपणीचा मित्र असून, त्यानेच त्यांची सलील सांबारीसोबत एप्रिल २०२२ रोजी ओळख करून दिली होती. सलील हा शेअर ट्रेडर असून, त्याने अनेकांचे पैसे शेअरमध्ये गुंतविले आहे. त्याने गुंतवणूक केलेल्या पैशांवर अनेकांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे त्याने त्याच्याकडे शेअरमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in