एनआरआय बँक लिमिट वाढविण्याचे आमिष दाखवून फसवणूक

बँक खात्यातून एक लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज पाहिल्यानंतर तिला फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला.
एनआरआय बँक लिमिट वाढविण्याचे आमिष दाखवून फसवणूक

मुंबई : एनआरआय बँक लिमिट वाढवून देतो, अशी बतावणी करून एका ६९ वर्षांच्या वयोवृद्ध अमेरिकन नागरिक असलेल्या महिलेची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला ही मूळची अमेरिकन नागरिक असून, ती १७ नोव्हेंबरला मुंबई फिरण्यासाठी भारतात आली होती. तेव्हापासून ती दिनशा वांच्छा रोड, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे वास्तव्यास आहे. काही दिवस राजस्थानच्या जयपूर येथे राहिल्यानंतर ती २३ नोव्हेंबरला मुंबईत आली होती. तिचे एका खासगी बँकेत एनआरआय अकाऊंट आहे. गुरुवारी तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून तो तिच्या बॅकेतून बोलत असल्याचे सांगितले. तिचे एनआयआर बँक लिमिट वाढवून देतो, असे सांगून त्याने तिच्या बँक खात्यासह ओटीपी प्राप्त केला होता. त्यानंतर तिच्या बँक खात्यातून एक लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज पाहिल्यानंतर तिला फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in