ड्रग्जच्या गुन्ह्यांत भावाला मदत करण्याचे आश्‍वासन देत फसवणूक

भावामुळे तुम्ही सर्वजण अडचणीत येऊ शकतात असे सांगून त्याने त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला
ड्रग्जच्या गुन्ह्यांत भावाला मदत करण्याचे आश्‍वासन देत फसवणूक
Published on

मुंबई : ड्रग्जच्या गुन्ह्यांत भावाला मदत करण्याचे आश्‍वासन देऊन एका कापड व्यापाऱ्याकडून अकरा लाखासह आयफोन घेऊन फसवणूक झाल्याचा प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नावेद सलीम परमार ऊर्फ पाव आणि चंद्रकांत गवारे या दोघांविरुद्ध डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यातील गवारे हा निलंबित पोलीस अधिकारी तर नावेद हा पोलीस खबरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. हुसैन इक्बाल बटाटेवाला हे कापड व्यापारी असून, ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझगाव परिसरात राहतात. याच परिसरात नावेद हा राहत असून, तो पोलीस खबरी असल्याचे साांगत होता.

मार्च महिन्यांत नावेद हा त्याच्या घरी आला आणि त्याने त्याचा भाऊ आसिफ कासम राजकोटवाला हा वांद्रे युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या एका गुन्ह्यांत पाहिजे आरोपी आहे. या युनिटमध्ये त्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गवारे हे मित्र असून, त्यांना सांगून तो त्याच्या भावाचे नाव या गुन्ह्यांतून काढून देतो असे सांगितले. भावामुळे तुम्ही सर्वजण अडचणीत येऊ शकतात असे सांगून त्याने त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी त्याला मदत करण्याची विनंती केली. प्रकरण चिघळू नये म्हणून त्यांनी त्यांची माफी मागून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणातून भावाला बाहेर काढण्यासाठी त्याने त्यांच्याकडे ३५ लाखांसह दोन आयफोनची मागणी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in