
मुंबई : अंधेरीतील एका व्यावसायिकाची आर्मी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या एका अज्ञात सायबर ठगाने सुमारे अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या तोतयाविरुद्ध जुहू पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा जुहू पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरू आहे. अंधेरी येथे राहणार्या तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांचा विदेशातून मशिनरी आयात करण्याचा व्यवसाय आहे. मे महिन्यांत ते त्यांच्या घरी होती. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्याने त्याचे नाव कुलदीप शर्मा असल्याचे तो आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून काम करतो. सध्या तो कुलाबा आर्मी स्कूलमध्ये कामाला आहे. त्याने त्यांच्याकडे काही मशिनरीची मागणी केली होती. आर्मीच्या गाड्याच्या दुरुस्तीसाठी या मशिनररीचा वापर होणार होता. मशिनरीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, त्यापूर्वी त्यांना आर्मीचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशनसाठी त्यांना ४८ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ही रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.