बोगस वेबसाईट बनवून नामांकित स्वीट्स शॉपच्या नावाने फसवणूक

राहुल डोंगरा असे बोगस वेबसाईट बनणवणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
बोगस वेबसाईट बनवून नामांकित स्वीट्स शॉपच्या नावाने फसवणूक

मुंबई : बोगस वेबसाईट बनवून नामांकित स्विट्स शॉपच्या नावाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका वॉण्टेड मुख्य सायबर ठगाला गावदेवी पोलिसांनी अटक केली. राहुल डोंगरा असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेने गावदेवी, मलबार हिल आणि एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आठ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई शहरातील एका नामांकित स्विट्स शॉपच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बोगस वेबसाईट बनविली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांकडून मिठाईची ऑर्डर आणि पैसे घेऊन त्यांची फसवणूक होत असल्याच्या काही तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी गावदेवी, मलबार हिल आणि एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत काही गुन्हे दाखल झाले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश गावदेवी पोलिसांना दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीनंतर या स्विट्स शॉपची बोगस वेबसाईट राहुल डोंगरा या व्यक्तीने तयार करून ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in